cheteshwar pujara saam tv news
क्रीडा

Cheteshwar Pujara: रोहितच्या या निर्णयामुळे पुजाराचं टेन्शन वाढलं! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही

Cheteshwar Pujara News: रोहितने संघासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेतेश्वर पुजाराचं टेन्शन वाढलं असेल.

Ankush Dhavre

Cheteshwar Pujara Comeback:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मात्र या मालिकेसाठी चेतेश्वर पुजाराला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. गेल्या काही वर्षांपासून तो कसोटी संघातील प्रमुख फलंदाज आहे.

ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान विराट बाहेर झाल्यानंतर पुजाराला संधी मिळेल अशी चर्चा सुरू होती. मात्र असं काहीच झालेलं नाही. रजत पाटीदारला संघात स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे पुजाराला कधीच संधी मिळणार नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे की, युवा खेळाडूंना संघात संधी मिळेल. मात्र त्याने असंही म्हटलं आहे की, पुजारासारख्या अनुभवी खेळाडूची संघाला गरज आहे. याबाबत चर्चा देखील झाली. मात्र युवा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळालीच पाहिजे.

रोहित शर्माचं म्हणणं स्पष्ट आहे की, वरीष्ठ खेळाडूंशिवाय खेळणं मुळीच सोपं नाही. पुजारासारख्या फलंदाजाने संघासाठी भरपूर धावा केल्या आहेत. या खेळाडूंकडे भरपूर अनुभव आहे. या खेळाडूंशिवाय खेळण्याचा निर्णय कठीण आहे. मात्र अनेकदा संघाचं सेटअप बसवण्यासाठी हे निर्णय घ्यावे लागतात. (Latest sports updates)

भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात..

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, के एल राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

SCROLL FOR NEXT