indian football team twitter
Sports

QAT vs IND: फुटबॉलमध्ये भारताविरुद्ध चिटींग? रेफ्रीचा कतारच्या बाजूने निर्णय अन् टीम इंडिया WC च्या शर्यतीतून बाहेर

Indian Football Team: फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील भारत आणि कतार यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघासोबत चिटींग झाल्याचा प्रकार घडला आहे.

Ankush Dhavre

भारतीय फुटबॉल संघाला फिफा वर्ल्डकप स्पर्धतील दुसऱ्या फेरीतील पात्रता फेरीतील सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तिसऱ्या फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. मंगळवारी झालेल्या सामन्यात भारत आणि कतार या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. भारतीय संघ पहिल्यांदाच सुनील छेत्रीच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला. अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाला कतारकडून २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात अंपायरने दिलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे भारतीय संघाच्या हातून हा सामना निसटला आहे.

भारतीय संघाकडून लालियानजुआला चांगटेने ३७ व्या मिनिटाला गोल केला. या गोलच्या बळावर भारतीय संघ १-० ने आघाडीवर होता. भारताने कतारच्या खेळाडूंना गुडांळून ठेवलं होतं. मात्र कतारकडून युसुफ एयमनने शेवटच्या काही मिनिटांमध्ये गोल केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फुटबॉल गोलपोस्टच्या पलीकडे गेला होता. त्यानंतर कतारच्या खेळाडूंनी बॉल ढकलला आणि गोलपोस्टच्या दिशेने ढकलत गोल केला.

खेळाडूंनी आक्षेप घेत अंपायरला सांगितलं, मात्र अंपायरने काहीच अॅक्शन घेतली नाही. या गोलसह कतारने भारतीय संघाची बरोबरी केली. भारतीय संघाला हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी होती. मात्र चिटींग झाल्यामुळे भारतीय संघ इतिहास रचण्यापासून वंचित राहिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

ही घटना सामन्यातील ७३ व्या मिनिटाला घडली. तोपर्यंत भारतीय संघ १-० ने आघाडीवर होता. मात्र या गोलनंतर कतारने भारतीय संघाची बरोबरी केली. मात्र या वादग्रस्त निर्णयानंतर भारतीय खेळाडूंची लय बिघडली. त्यानंतर ८५ व्या मिनिटाला कतारने दुसरा गोल करत भारतीय संघावर २-१ ने आघडी घेतली. यासह कतारने पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. यासह कतारने अफगाणिस्तानला देखील १-० ने पराभूत केलं होतं. तर भारतीय संघाचं फिफा वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न मोडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बापाची हत्या केली अन् मृतदेह घरातच पुरला, दुर्गंधीनंतर लेकाचं बिंग फुटलं, संभाजीनगर हादरलं

Sunday special horoscope: आजचा दिवस नशीब उजळणारा! या राशींना मिळणार कामात प्रगती आणि आर्थिक लाभ

Pune News: प्रामाणिक अंजूताई! मालकाचा शोध घेत परत केली सापडलेली 10 लाख रुपयांची बॅग

Maharashtra Politics: साताऱ्यात एकनाथ शिंदेंना धक्का, लाडक्या बहिणीनं सोडली साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणार, अजित पवारांनी दिले संकेत, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT