indian para swimmer mohammad shams alam sheikh AI Image
Sports

Shocking : मोठी बातमी! भारतीय खेळाडूला अटक; धक्कादायक कारण समोर

Indian Para Swimmer Mohammad Shams Alam Sheikh News : जपानमधील नागोया येथील हॉटेलमध्ये भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख याच्यावर महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाचा आरोप.

Alisha Khedekar

  • भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेखला अटक

  • जपानमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाचा आरोप

  • नागोया येथील फोर पॉइंट्स बाय शेराटन हॉटेलमध्ये घडली घटना

  • पोलिसांचा पुढील तपास सुरु

जपानमध्ये सध्या आशियाई पॅरा गेम्स सुरु आहेत. या गेम्सदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. भारतातील एका जलतरण खेळाडूने हाऊसकिपींग करणाऱ्या महिलेसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी या खेळाडूवर गुन्हा दाखल करून त्याला भारतात पुन्हा पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. मोहम्मद शम्स आलम शेख असे या आरोपी खेळाडूचे नाव आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना नागोया येथील फोर पॉइंट्स बाय शेराटन हॉटेलमध्ये घडली. भारतीय पॅरा जलतरण संघाचे खेळाडू या हॉटेलमध्ये राहत होते. या दरम्यान हॉटेलच्या एका खोलीत हाऊसकीपिंगसाठी एक महिला कर्मचारी गेली होती. खोलीत गेल्यानंतर संबंधित खेळाडूने तिच्या अंगाला हात लावत तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एका भारतीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला कर्मचाऱ्याने या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी संबंधित खेळाडूला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणात अयोग्य स्पर्श, अश्लील हावभाव आणि जबरदस्ती लैंगिक छळ केल्याचे आरोप करण्यात आल्याचे वृत्त आहे.

घटनेची माहिती स्थानिक आयोजन समितीने भारतीय पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी भारतीय पथकाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. तसेच संबंधित महिला कर्मचाऱ्याची लेखी माफी मागायला सांगितली आणि आरोपी खेळाडूला जपानमधून परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार, शेखला दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले आणि मंगळवारी त्याच्या भारतात परतीची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल भारतीय पॅरालिम्पिक समिती घेण्याची शक्यता आहे. संबंधित खेळाडूवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यासह आजीवन बंदी घालण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: मोठी बातमी! राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, मतदान अन् निकाल कधी?

Maharashtra News Live Update: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 15 उमेदवारांच्या अर्ज बाद

Stress Relief Flower : दिवसभराचा तणाव कमी करण्यासाठी मदत करेल 'हे' सुगंधी पांढरं फूल, घरात नक्की लावा याचं रोप

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं १७००० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Clothes Washing Tips: कपडे धुण्यापूर्वी किती वेळ भिजत घालावेत? रात्रभर कपडे भिजवून ठेवल्याने कपड्यांचे काय नुकसान होते?

SCROLL FOR NEXT