Rohit sharma Saam Tv
Sports

IND VS AUS 3rd Test: भारताचे शेर मैदानावर झाले ढेर..! इंदूर कसोटीत लाजीरवाण्या पराभवाची ‘ही’ आहेत ५ प्रमुख कारणे

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने १९ व्या षटकात सामना जिंकला आणि मालिकेत २-१ ने जोरदार कमबॅक केले आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS Reasons Behind India's Defeat: ऑस्ट्रेलिया संघाने इंदूर कसोटी सामन्यात ९ गडी राखून विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ७६ धावांचे आव्हान दिले होते.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने १९ व्या षटकात सामना जिंकला आणि मालिकेत २-१ ने जोरदार कमबॅक केले आहे. ज्यावेळी कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी असे वाटले होते की, भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारणार.

मात्र दोन्ही डावात भारतीय फलंदाज फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. चला तर पाहूया भारतीय संघाची पराभवाची कारणे. (Latest sports updates)

१) टॉप ऑर्डर फ्लॉप:

या सामन्यात भारतीय फलंदाज अडचणीचा सामना करताना दिसून आले. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र हे तिघेही फलंदाज दोन्ही डावात फ्लॉप ठरले.

२)नॅथन लायन नडला:

हा सामना सुरु होण्यापूर्वीच नॅथन लायनची चर्चा सूर होती. ही चर्चा का सुरु होती हे त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात करून दाखवलं. त्याने भारतीय बॅटिंग ऑर्डरचं कंबरडं मोडलं. त्याने या सामन्यातील दुसऱ्या डावात ८ गडी बाद केले. तर संपूर्ण सामन्यात त्याने ११ गडी बाद केले.

३) खेळपट्टी:

भारतीय संघाला पराभूत करण्यात खेळपट्टीने देखील मोलाची भूमिका बजावली. या खेळपट्टीवर चेंडू जरा जास्तच स्पिन होत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे भारतीय फलंदाज अडचणीचा सामना करताना दिसून आले. दोन्ही संघातील फलंदाज अडचणीत असताना पुजारा आणि ख्वाजाने टिचून फलंदाजी केली आणि सर्वांना दाखवून दिलं की , या खेळपट्टीवरही फलंदाजी केली जाऊ शकते.

४) जडेजा,अश्विन आणि अक्षर पटेलचे फलंदाजीत न मिळलेले योगदान :

दिल्ली कसोटी भारतीय संघ ज्यावेळी अडचणीत होता त्यावेळी अक्षर पटेल, आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने मोलाची खेळी करून भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले होते. मात्र या डावात ही तिकडी फलंदाजीत योगदान देऊ शकली नाही. मात्र रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. याच कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर आटोपला होता.

५) अतिउत्साह नडला:

दिल्ली आणि नागपूर कसोटीत भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी केली होती. या कामगिरीमुळे भारतीय संघाचा उत्साह वाढला होता. हाच अतिउत्साह भारतीय संघाला नडल्याचे पाहायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

कॅबिनेट मंत्र्यांचं निधन, मध्यरात्री आला हार्ट अटॅक, राजकीय वर्तुळात शोकाकूल वातावरण

SCROLL FOR NEXT