team india  twitter
Sports

IND vs AUS, Playing XI: भारताची प्लेइंग 11 ठरली! पहिल्या कसोटीत हा तगडा संघ घेऊन उतरणार मैदानात

Team India Playing XI Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Team India Playing XI Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर- गावसकर मालिका सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या WACA स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत.

दरम्यान सामन्याच्या एक दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार जसप्रीत बुमराहने मोठे खुलासे केले आहेत. या मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे आहे. मात्र रोहितने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्यामुळे या सामन्यात जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल?

या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना बुमराह हसला आणि प्लेइंग ११ आधीच ठरली आहे, असं सांगितलं .

भारतीय संघ पूर्ण ताकदीने मैदानात येण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र रोहित शर्मासह शुभमन गिलदेखील या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. मात्र बुमराने याबाबत कुठलीही अपडेट दिलेली नाही.

या खेळाडूंना मिळू शकते पदार्पणाची संधी

मालिकेतील पहिल्याच सामन्यात काही खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. ज्यात नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नितीश कुमार रेड्डी मध्यमगती गोलंदाज असून तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.

यासह हर्षित राणा उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरु शकतो. ऑस्ट्रेलियाला येण्यापूर्वी जसप्रीत बुमराहला माहित नव्हतं की, त्याला ऑस्ट्रेलियात जाऊन नेतृत्वाची जबाबदारी मिळणार आहे. मात्र रोहित पहिल्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, आर अश्विन, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT