Cameron Green Ruled Out: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या २ मालिकांमध्ये भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने गेल्या २ मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा घरात घुसून पराभव केला आहे.
त्यामुळे यावेळी भारतीय संघ विजयाची हॅट्रीक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू कमीत कमी ६ महिन्यांसाठी संघातून बाहेर पडला आहे.
काही दिवसांपूर्वीच कॅमरुन ग्रीन दुखापतग्रस्त असल्याची बातमी आली होती. ग्रीनच्या पाठीच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे तो कमीत कमी ६ महिने संघाबाहेर राहणार आहे. याच कारणामुळे तो भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर होऊ शकतो. भारतासह श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेतूनही तो बाहेर होऊ शकतो. यासह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला देखील मुकण्याची शक्यता असणार आहे.
कॅमरुन ग्रीनचा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला. होता. या दौऱ्यावरील शेवटच्या वनडे सामन्यात कॅमरुन ग्रीनने ४९ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली होती. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही त्याचा जलवा पाहायला मिळाला होता. त्याने ६ षटकात २ गडी बाद केले होते.
कॅमरुन ग्रीनच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी २८ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या दरम्यान त्याने फलंदाजी करताना १३७७ धावा केल्या आहेत.
तर गोलंदाजी करताना त्याने ३५ गडी बाद केले आहेत. तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २८ सामने खेळताना ६२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान गोलंदाजी करताना त्याने २० गडी बाद केले आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने १३ सामन्यांमध्ये २६३ धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजी करताना त्याने १२ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.