pv sindhu  twitter
Sports

PV Sindhu: हक्काचं मेडल निसटलं! PV Sindhu ची पॅरिस ऑलिंपिकमधून धक्कादायक एक्झिट

Paris Olympics 2024,PV Sindhu vs He Bingjiao Pre Quarter Finals: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला चीनच्या बिंग जिआओकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत पीव्ही सिंधूला पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र तिला चीनच्या बिंग जिआओकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत तिचा प्रवास समाप्त झाला आहे. सात्विकराज आणि चिराग शेट्टी यांचा पराभव हा भारतीय फॅन्ससाठी सर्वात मोठा धक्का होता. त्यानंतर एकाच दिवशी २ पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या खेळाडूंचा पराभव हा भारतीय फॅन्सला न पचणारा आहे.

पीव्ही सिंधू आणि बिंग जिआओ या दोन्ही खेळाडूंमध्ये काँटे की टक्कर पार पडली. पहिल्या गेममध्ये बिंग जिआओने आघाडी घेतली. तिने पीव्ही सिंधूला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. बिंग जिआओ १० गुणांच्या जवळ असताना पीव्ही सिंधू संघर्ष करताना दिसून येत होती. मात्र पीव्ही सिंधूने दमदार कमबॅक केलं आणि बरोबरी साधली. मात्र डावखुऱ्या हाताच्या बिंग जिआओने सिंधूच्या बॉडीलाईनवर अटॅक करणं सुरु ठेवलं. मात्र हा गेम सिंधूला २१-१९ ने गमवावा लागला.

दुसऱ्या गेममध्येही बिंग जिआओ दमदार सुरुवात केली. पहिला गेम जिंकून आघाडी घेतलेल्या बिंग जिआओने दुसऱ्या गेममध्येही शानदार सुरुवात केली. मात्र सिंधूने लागोपाठ ३ पाँईंट्स घेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या गेममध्येही सिंधूकडून ती स्पीड आणि ती मुवमेंट दिसून आली नाही. या गेममध्ये पीव्ही सिंधूला २१-१४ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

Maharashtra News Live Update: उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत- परिवहन मंत्री

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

SCROLL FOR NEXT