Big shock to Team India before World Cup 2023 Akshar Patel Not Playing ind vs aus 3rd one day match
Big shock to Team India before World Cup 2023 Akshar Patel Not Playing ind vs aus 3rd one day match saam tv
क्रीडा

ICC World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेआधी टीम इंडियाला मोठा धक्का; दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर?

सतीश दौड-पाटील

ICC World Cup 2023 Team India Player List

वनडे विश्वचषक स्पर्धेला आता आठवडाभर इतका कालावधी उरला आहे. आपल्या संघातील खेळाडू फिट राहावे, यासाठी प्रत्येक टीम इंडियासह इतर संघ खेळाडूंच्या फिटनेसवर अधिकच लक्ष देत आहेत. एकीकडे पाकिस्तान संघातील खेळाडूंना फिटनेसचं ग्रहण लागलं असताना दुसरीकडे टीम इंडियासाठी देखील वाईट बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळत आहेत. या मालिकेतील तिसरा सामना लवकरच खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी  टीम इंडियाने (Team India) आपला संघ जाहीर केला असून अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये अक्षर पटेलचं नाव नाहीये.

अक्षरला आशिया कप स्पर्धेत बांग्लादेशविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात खेळू शकला नाही. आता वर्ल्डकप सुरु होण्याआधी तो पूर्णपणे फिट होऊन भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी सर्वांना आशा होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात देखील अक्षर पटेलचं नाव नाहीये.

दरम्यान अक्षर पटेल तिसऱ्या सामन्यात अक्षर पूर्णपणे फिट असेल तरच त्याला खेळवण्यात येईल, असं बीसीसीआयने आधीच सांगितलं होतं. आता तिसऱ्या सामन्यात अक्षर पटेल याचं नाव नाहीये. त्यामुळे अक्षर पटेल पूर्णपणे फिट आहे की नाही, याबाबत अजूनही सांशकता आहे.

दुसरीकडे अक्षर पटेलच्या जागी भारतीय संघ व्यवस्थपनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रविचंद्रन आश्विन आणि वॉशिग्टन सुंदर यांची निवड केली आहे. त्यामुळे अक्षर जर वर्ल्डकपपूर्वी पूर्णपणे फिट झाला नाही. तर आश्विन किंवा सुंदरला त्याच्या जागी संधी मिळू शकते. वर्ल्डकपसाठी आधीच सर्व संघांनी आपल्या १५ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत २८ सप्टेंबरपर्यंत बदल करता येणार आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Good News: ५०० रुपयांना LPG सिलिंडर, २०० युनिपर्यंत मिळणार मोफत वीज; गरीबांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Rashi Bhavishya: कन्यासह कुंभ राशीच्या लोकांना येणार सुखाचे दिवस; तुमची रास?

Daily Horoscope: कुंभ राशीत तयार झाला धनशक्ती राजयोग; या ५ राशींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

Ramtek lok sabha : शिंदेंच्या गटाची अडचण होणार? रामटेक लोकसभेवर भाजप नेत्यांचा डोळा

Maval Lok Sabha Constituency: मावळमध्ये राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणायचा; लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने कसली कंबर

SCROLL FOR NEXT