gautam gambhir head coach saam tv
Sports

Team India Head Coach: T-20 WC आधी BCCI चा मोठा निर्णय! गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड जवळपास निश्चित

Gautam Gambhir Named Head Coach Of Team India: बीसीसीआयकडून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे.

Ankush Dhavre

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुख्यप्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे पुढील मुख्यप्रशिक्षक कोण? याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. या पदासाठी अनेक दिग्गज मंडळींची नावं समोर आली. अशामध्ये बीसीसीआयने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुले गौतम गंभीरचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. नुकताच कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलची ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी जिंकून देण्यात गौतम गंभीरने मोलाची भूमिका बजावली. त्याला या संघाच्या मेंटॉरची जबाबदारी देण्यात आली होती.

ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पडली. दरम्यान फायनलचा सामना झाल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह गौतम गंभीरसोबत चर्चा करताना दिसून आले होते. इथेच मुख्य प्रशिक्षक पदाबाबत चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगामी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही राहुल द्रविड यांची मुख्यप्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा असणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर त्यांचा मुख्यप्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआयने १३ मे रोजी गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवले होते. हे अर्ज दाखल करण्याची करण्याची शेवटची तारीख २७ मे होती.

या पदासाठी ३००० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केला. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर आणि एमएम धोनी यांच्या बनावटी अर्जांचा देखील समावेश होता. गौतम गंभीरने ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याचा कार्यकाळ हा १ जुलै २०२४ पासून ते २०२७ वनडे वर्ल्डकपपर्यंत असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT