Big blow to Team India, Hardik Pandya out of World Cup 2023 tournament Saam TV
Sports

Hardik Pandya: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का; हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर, या खेळाडूचा संघात समावेश

Hardik Pandya Latest News: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या बाहेर झाला आहे.

Satish Daud

Team India Hardik Pandya Latest News

वर्ल्ड कपमध्ये 2023 स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या बाहेर झाला आहे. आयसीसीने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापतग्रस्त झाला होता. गोलंदाजी करताना हार्दिकचा पायाला दुखापत झाली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हार्दिक दुखापतीमधून बरा व्हावा म्हणून भारतीय संघ व्यवस्थापनाने (Hardik Pandya) त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले होते. तेथे हार्दिकच्या फिटनेसची चाचणी सुरू होती. हार्दिक पांड्या लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना भारतीय क्रिडाप्रेमी करीत होते. मात्र, चाहत्यांची ही प्रार्थना कामाला आली नाही.

अखेर हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावे लागले. ICC ने याबाबतची पुष्टी केली आहे.  हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णा हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रॅक्टिस करीत होता. शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

प्रसिद्धला विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव नाही. त्याला बॅकअप म्हणून तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान हार्दिक पांड्या बाहेर गेल्याने टीम इंडियासह कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे.

कारण, हार्दिक पांड्याची उणीव संघाला जाणवणार आहे. टीम इंडियाने वर्ल्डकप सेमीफायनलची फेरी गाठली असली, तरी साखळी फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत.  टीम इंडियाचा सामना 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँडशी होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT