Big blow to Rajasthan Royals saam tv
Sports

Sanju Samson: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का; कर्णधार संजू सॅमसनला पुन्हा दुखापत, टूर्नामेंटमधून बाहेर होणार?

IPL 2025 DC vs RR: बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. मात्र या सामन्यात राजस्थानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संजूला सॅमसनला दिल्लीविरूद्धच्या सामन्यात पुन्हा दुखापत झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. टीमचा कर्णधार संजू सॅमसनला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. बुधवारी आयपीएलमध्ये ३२ वा सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात फलंदाजीसाठी संजू सॅमसन मैदानावर उतरला. मात्र अवघ्या ३१ रन्सवर तो रिटायर्ड हर्ट झाला. यावेळी त्याला वेदना होत असल्याचं दिसून आलं.

दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजी करताना राजस्थानच्या टीमला १८९ रन्सचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल ओपनिंग करण्यासाठी उतरले. डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये मध्ये संजू सॅमसन फलंदाजी करत होता. विप्राज निगमच्या तिसऱ्या बॉलवर त्याने लॉग्न ऑफला शॉट लगावला. परंतु यावेळी त्याने रन घेतला नाही आणि यानंतरच त्याला वेदना होऊ लागल्या.

मैदानातून बाहेर गेला संजू सॅमसन

संजूची परिस्थिती पाहता राजस्थान रॉयल्सचे फिजीयो मैदानात पोहोचले. त्यांनी संजू सॅमसनची तपासणी केली. ब्रेकमध्ये त्याला काही औषधांच्या गोळ्या देखील देण्यात आल्या. मात्र या उपचारांनीही त्याला बरं न वाटल्याने संजूला मैदान सोडावं लागलं. संजूने त्याच्या या खेळीत १९ बॉल्समद्ये ३१ रन्स केले होते.

आयपीएलमधून बाहेर होणार संजू?

दरम्यान संजूची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नुकतंच संजू सॅमसन दुखापतीतून बरा होऊन आला होता. त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आता त्याला पुन्हा दुखापत झाली आहे. जर संजूची दुखापत जास्त गंभीर नसेल तर तो पुन्हा मैदानावर परतण्याची शक्यता आहे. मात्र दुखापत गंभीर असल्यास तो यंदाच्या टूर्नामेंटमधून बाहेर होऊ शकतो.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८८ रन्स केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून राजस्थान रॉयल्सनेही २० ओव्हर्समध्ये १८८ रन्स केले. यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. ज्याने दिल्लीने राजस्थानचा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT