virat kohli saam tv news
Sports

IND vs AFG 1st T20I: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर; नेमकं कारण काय?

Virat Kohli: भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर झाला आहे. वाचा काय आहे कारण.

Ankush Dhavre

Virat Kohli Ruled Out From IND vs AFG 1st T20I:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली टी -२० क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहेत. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर दोघंही टी -२० क्रिकेट खेळताना दिसून आले नव्हते.

मात्र आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोघंही भारतीय संघात परतले आहेत. दरम्यान पहिल्याच सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

जेव्हापासून ही बातमी समोर आली आहे की, विराट पहिला टी -२० सामना खेळणार नाही. तेव्हापासून क्रिकेट चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे की, विराट पहिला टी -२० सामना न खेळण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

विराट कोहली बाहेर असण्याचं कारण काय?

विराटने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या टी -२० सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या एक दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड यांनी याबाबत खुलासा केला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघासाठी ही मालिका अतिशय महत्वाची असणार आहे. कारण आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ही शेवटची टी -२० मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला संघबांधणी करण्याची ही शेवटची संधी असणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवसारखे प्रमुख खेळाडू खेळताना दिसून येणार नाही. हे दोघेही दुखापतग्रस्त आहे. मात्र दोघेही टी -२० वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसून येऊ शकतात.

अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन/जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव/रवी बिश्नोई आणि मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

Maharashtra Live News Update: निवडणुकीत कोणासोबत युती किंवा आघाडी करायची यासंदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

SCROLL FOR NEXT