shubman gill with shreyas iyer google
Sports

IND vs ENG, Test Series: टीम इंडियाला मोठा धक्का! विराटनंतर संघातील प्रमुख फलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर

Shreyas Iyer Injury News: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. संघातील प्रमुख फलंदाज मालिकेतून बाहेर होऊ शकतो.

Ankush Dhavre

IND vs ENG Test Series, Shreyas Iyer News:

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये रंगणार आहे. दरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Shreyas Iyer Injury)

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्याने बीसीसीआयच्या मेडिकल टीमला आपल्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. त्याला फॉरवर्ड डिफेन्स करताना वेदना जाणवत आहेत. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्वचिन्ह उपस्थित केले जात आहेत. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो राजकोट कसोटीतून बाहेर होऊ शकतो.

दुखापतीनंतर केलं कमबॅक...

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याला मैदानापासून बराच काळ दूर राहावं लागलं होतं. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्याला पाठीच्या दुखण्याचा त्रास होऊ लागला आहे. तो जर या मालिकेतून बाहेर पडला. तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी दिली जाईल. त्यामुळे सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. (Cricket news in marathi)

मुख्य बाब म्हणजे, पहिला कसोटी सामना झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोघेही दुखापतीमुळे संघाबाहेर होते. मात्र राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी हे दोघेही कमबॅक करु शकतात.

या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने दमदार कमबॅक करत विजय मिळवला. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली होती. तर उर्वरित ३ सामन्यांसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन..

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार, ओम बिर्लांची घेतली भेट

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT