team india yandex
Sports

Team India News: टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार खेळाडूचं कमबॅक होणं कठीण; जय शहांनी दिली मोठी अपडेट

Mohammed Shami Comeback: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आगामी कसोटी मालिकेतून कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता जय शहा यांनी मोठी अपडेट दिली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. आतापर्यंत दोन वेळेस या स्पर्धेची फायनल खेळणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे.

येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोहम्मद शमीच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट दिली आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी

मोहम्मद शमी (Mohammed Shami)हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत तो कमी सामने खेळून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं.

बीसीसीआयचे प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर यांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीच्या कमबॅकबाबत संकेत दिले होते. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, शमीचं बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत कमबॅक करणं कठीण आहे. तो थेट न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.

काय म्हणाले जय शहा?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धा अतिशय महत्वाची असणार आहे. या मालिकेत संपूर्ण दारोमदार भारतीय वेगवान गोलंदाजांवर असणार आहे.

त्यामुळे संघातील प्रमुख गोलंदाज संघात असणं अतिशय महत्वाचं असणार आहे. तसेच शमीच्या कमबॅकबाबत बोलताना जय शहा म्हणाले की, 'मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी मालिका खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. एनसीएच्या रिपोर्टनंतर त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.'

काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. ज्यात तो गोलंदाजीचा सराव करताना दिसून आला होता. गेले काही महिने त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर राहावं लागलं आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तो रणजी ट्रॉफी स्पर्धेतही खेळताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT