big blow for sunrisers hyderabad Wanindu Hasaranga Ruled Out Of IPL 2024 amd2000 twitter
Sports

IPL 2024: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर हैदराबादला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज IPL 2024 स्पर्धेतून बाहेर

Sunrisers Hyderabad News: चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

Wanindu Hasaranga Ruled Out Of IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नईला नमवत हैदराबादने शानदार विजय मिळवला. हा सनरायझर्स हैदराबादचा या हंगामातील दुसरा विजय ठरला आहे. दरम्यान या विजयानंतर हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघातील अनुभवी गोलंदाज वानिंदू हसरंगा आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळण्यापूर्वी त्याने आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला आपल्या ताफ्यात स्थान दिलं. त्याला आयपीएल स्पर्धेत २६ सामने खेळण्याचा अनुभव आहे.

यादरम्यान त्याने ८.१३ च्या इकोनॉमीने आणि २१.३७ च्या सरासरीने ३५ गडी बाद केले आहेत. यादरम्यान १८ धावा खर्च करत ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. गोलंदाजीत चांगली कामगिरी केली असली तरीदेखील फलंदाज म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. (Cricket news in marathi)

अशी आहे कारकिर्द...

वानिंदू हसरंगाने गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे. मात्र फलंदाज म्हणून त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. फलंदाजीत त्याला ९८.६३ च्या स्ट्राईक रेटने आणि ७.२ च्या सरासरीने अवघ्या ७२ धावा करता आल्या आहेत. या हंगामासाठी त्याला सनरायझर्स हैदराबाद संघात स्थान दिलं गेलं आहे.

मात्र तो या संघाकडून एकही सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला नाही. तो कमबॅक करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने ४ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा पुढील सामना येत्या ९ एप्रिल रोजी पंजाब किंग्स संघाविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT