team india twitter
क्रीडा

IND vs SL,ODI Series: भारत-श्रीलंका मालिका सुरु होण्यापूर्वीच संघाला मोठा धक्का! संघातील 2 खेळाडू मालिकेतून बाहेर

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेपूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. संघातील २ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. श्रीलंका संघातील प्रमुख खेळाडू दिलशान मधुशंका आणि मथीशा पथिराना हे दोघेही भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसून येणार नाहीये. या खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची देखील घोषणा करण्यात आली आहे.

दिलशान मधुशंका (Dilshan Madushanka) आणि मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) यांची रिप्लेसमेंट म्हणून इशान मलिंगा आणि मोहम्मद शिराजला संधी देण्यात आली आहे. वनडे मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत श्रीलंकेला ३-० ने धूळ चारली.

येत्या २ ऑगस्टपासून ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसून येणार नाहीये. श्रीलंका क्रिकेट बोर्डने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

पथिराना भारतीय संघाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत खेळताना दिसून आला होता. या मालिकेत क्षेत्ररक्षण करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळताना दिसून येणार नाही. त्याने श्रीलंकेसाठी शानदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी आक्रमणात नक्कीच त्याची कमतरता जाणवेल. हे दोन्ही खेळाडू मालिकेतून बाहेर पडल्यानंतर इशान मलिंगा आणि मोहम्मद शिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे.

वनडे मालिकेसाठी असा आहे श्रीलंकेचा संघ:

चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदु मेंडिस, जेनिथ लियानगे, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षाना, अकिला धनंजय,असिथा फर्नांडो, निशान मदुश्का, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेललागे, इशान मलिंगा, मोहम्मद शिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT