big blow for rcb glenn maxwell may miss the next match against srh due to injury says report amd2000 twitter
Sports

RCB 2024: मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर RCB ला मोठा धक्का! स्टार खेळाडूच्या दुखापतीने वाढवलं टेन्शन

Glenn Maxwell Injury: आयपीएल २०२४ स्पर्धेत गुरुवारी (११ एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत गुरुवारी (११ एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार खेळ करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. हा रॉयल चॅलेंजर्स संघाचा या हंगामातील पाचवा पराभव ठरला आहे. दरम्यान या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

प्रमुख खेळाडू काही सामन्यांना मुकणार..

स्टार खेळाडूंनी सुसज्ज असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाने १ सामना जिंकला आहे. तर ५ सामने गमावले आहेत. दरम्यान गुणतालिकेत तळाशी असताना संघाच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल पुढील सामन्यातून बाहेर होऊ शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. ग्लेन मॅक्सवेल या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. न्यूज २४ ने दिलेल्या वृत्तानुसार ग्लेन मॅक्सवेलच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला पुढील सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते.

आयपीएल २०२४ स्पर्धेत फ्लॉप...

ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२४ स्पर्धेत येण्यापूर्वी तुफान फॉर्ममध्ये तुफान फॉर्ममध्ये होता. मात्र या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी खेळताना पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. या स्पर्धेतील ६ सामन्यांमध्ये त्याला अवघ्या ३२ धाव करता आल्या आहेत. फंलंदाजीत फ्लॉप ठरत असला तरीदेखील गोलंदाजीत त्याने ४ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

SCROLL FOR NEXT