ind vs nz yandex
Sports

IND vs NZ मालिकेआधी मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर

Ben Sears Ruled Out: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी स्टार गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 1st Test: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी संघांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

न्यूझीलंडचा संघ काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या मालिकेदरम्यान सराव करत असताना बेन सियर्सला दुखापत झाली होती. दुखापतग्रस्त झाल्यानंतर गेल्या आठवड्यात स्कॅन करण्यात आला होता. स्कॅन केल्यामुळे त्याला भारतात येण्यासाठी उशीर झाला.

स्कॅन केल्यानंतर त्याची दुखापत गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. दुखापतग्रस्त झाल्यानंतर असं म्हटलं जात होतं की, लवकरात लवकर ठीक होईल. मात्र असं काहीच झालेलं नाही. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संघाबाहेर होताच रिप्लेसमेंटची घोषणा

सियर्स संघाबाहेर होताच त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्या जागी जेकब डफीचा संघात समावेश करण्यात आला आहे. जेकबच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

यावेळी तो पहिल्यांदाच न्यूझीलंडकडून कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतात फिरकी गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर जेकब कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे न्यूझीलंडचा संघ:

टॉम लेथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिला कसोटी सामना), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, विल ओ'रूर्क, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सॅन्टनर, जेकब डफी , ईश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टिम साऊथी, केन विल्यमसन, विल यंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT