big blow for mumbai indians srilankan bowler dilshan madushanka injured may ruled out of ipl 2024  saam tv new
Sports

IPL 2024: IPL आधीच मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं! संघातील हुकमी एक्का दुखापतग्रस्त

Dilshan Madhushanka Injury: आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.

Ankush Dhavre

Dilshan Madushanka, IPL 2024:

सध्या श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरु आहे. श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मधुशंका दुखापतग्रस्त झाल्याने या मालिकेतून बाहेर पडला आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला ४.६० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. श्रीलंका क्रिकेटने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सकडून कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.

या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडावं लागलं होतं. आता तिसऱ्या सामन्यापूर्वी तो पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे तो या सामन्यातून बाहेर पडला आहे. तसेच तो मालिकेतील पुढील सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाही. अशी माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पोस्ट शेअर करत दिली आहे.

मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढणार?

आयपीएल स्पर्धा तोंडावर असताना दिलशान मधुशंका दुखापतग्रस्त होणं हा मुंबई इंडियन्स संघासाठी मोठा धक्का असणार आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याची मुळ किंमत ५० लाख रुपये इतकी होती. त्याच्यावर मुंबईने ४.६० कोटी खर्च केले आणि आपल्या संघात स्थान दिले. तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये झळकणार होता. मात्र दुखापतीमुळे त्याला पदार्पण करायला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

अशी राहिलीये कारकिर्द..

दिलशान मधुशंकाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याला १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. यादरमन्यान त्याने १४ गडी बाद केले आहेत. तर २४ धावा खर्च करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २३ वनडे सामन्यांमध्ये ४१ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT