big blow for mumbai indians rohit sharma may ruled out of ipl 2024 due to injury hardik pandya  saam tv news
Sports

Rohit Sharma Injury Update: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! रोहित IPL 2024 स्पर्धेला मुकणार? वाचा कारण

IPL 2024: नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या मालिकेत ४-१ ने विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Injury Latest Update:

नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या मालिकेत ४-१ ने विजय मिळवला आहे. ही मालिका संपल्यानंतर आता सर्व खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठीचा सराव करण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. दरम्यान या स्पर्धेपू्र्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शेवटच्या कसोटीत दुखापतग्रस्त झालेला रोहित शर्मा आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा सामना धरमशालेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. दरम्यान सामन्यातील तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा पाठीच्या दुखण्यामुळे मैदानावर क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर उतरला नव्हता. त्याच्याऐवजी जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. बीसीसीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली होती.

रोहित शर्मा तिसऱ्या दिवशी मैदानावर आला नव्हता. त्याची दुखापत गंभीर आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्याची दुखापत जर गंभीर असेल तर या स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता रोहित शर्मा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार का? की स्पर्धेतून बाहेर पडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Cricket news in marathi)

रोहित शर्मा २०१३ पासून मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करतोय. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

SCROLL FOR NEXT