indian cricket team twitter
Sports

Team India T20I Captain: हार्दिक पंड्याला मोठा धक्का! रोहितनंतर हा स्टार खेळाडू होणार टी-20 संघाचा कर्णधार?

Suryakumar Yadav: रोहित शर्मानंतर भारतीय संघ फुल टाईम कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे भारतीय ही जबाबदारी संघातील स्टार फलंदाजावर सोपवली जाऊ शकते.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यावर भारतीय संघाने ४-१ ने बाजी मारली. यापुढे भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावरही संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान श्रीलंका दौऱ्यावर टी -२० संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली जाणार आहे.

कोण होणार कर्णधार?

भारतीय संघाने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. दरम्यान या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्णधाराची खुर्ची रिकामी आहे. या जागेसाठी हार्दिक पंड्याचं नाव आघाडीवर होतं. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव भारतीय टी -२० संघाचा कर्णधार होऊ शकतो. (Team India T20I Captain)

ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या, वृत्तानुसार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारतीय टी -२० संघाचा पुढील कर्णधार होऊ शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय भविष्याचा विचार करून हा निर्णय घेऊ शकते. कारण भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप आणि टी -२० मालिकेसाठी पूर्णवेळ कर्णधार हवा आहे. हार्दिक पंड्या अनेकदा दुखापतीमुळे बाहेर असतो. त्यामुळे सूर्यकुमार यादवकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

भारतीय संघाचा श्रीलंका दौरा २७ जुलैपासून सुरू होणार आहे. सूर्यकुमार यादव या दौऱ्यावर होणाऱ्या टी -२० मालिकेतून नेतृत्वाची कमान सांभाळताना दिसून येऊ शकतो. हार्दिक पंड्याचा या दौऱ्यासाठी संघात समावेश केला जाईल. मात्र त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी नसेल. सूर्यकुमार यादवला भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT