big blow for gujarat titans robin minz ruled out of ipl 2024 due to injury ashish nehra revealed  yandex
Sports

Gujarat Titans: IPL आधीच गुजरातला मोठा धक्का! संघातील विस्फोटक फलंदाज स्पर्धेतून बाहेर; कोचने सांगितलं कारण

IPL 2024, Gujarat Titans: आयपीएल २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना येत्या २२ मार्च रोजी रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे

Ankush Dhavre

Robin Minz Ruled Out Of IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना येत्या २२ मार्च रोजी रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर गुजरात टायटन्स संघाची पहिली लढत २४ मार्च रोजी मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना एक आठवड्यावर असलेल्या गुजरात टायटन्स संघाचं टेन्शन वाढलं आहे. संघातील यष्टिरक्षक फलंदाज रॉबिन मिंझ संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. संघाचा प्रशिक्षक आशिष नेहराने याबाबत खुलासा केला आहे. त्याने सांगितलं आहे की, बाईक अपघातात दुखापतग्रस्त झालेला रॉबिन मिंझ (Robin Minz) आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही.

रॉबिन मिंझचे वडील फ्रान्सिस मिंझ यांनी सांगितलं की, रॉबिन सुपर बाईक चालवत होता. त्यावेळी त्याचं बाईकवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे त्याचा अपघात झाला. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र दुखापत इतकी आहे की, तो क्रिकेट खेळू शकणार नाही. (Cricket news in marathi)

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात गुजरात टायटन्स संघाने त्याला ३.६० कोटींची बोली लावत संघात स्थान दिले होते.तो आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान पूर्णपणे फिट होण्याची शक्यता खूप कमी आहे. असं आशिष नेहराने सांगितलं. रॉबिन मिंझ हा आयपीएल स्पर्धेत बोली लागलेला पहिला आदिवासी खेळाडू आहे.

झारखंडमध्ये राहणाऱ्या रॉबिन मिंझला प्रसिद्ध करण्यात एमएस धोनीचा मोलाचा वाटा आहे. माध्यमातील वृत्तात असं म्हटलं गेलं होतं की, एमएस धोनीने रॉबिन मिंझच्या वडिलांना आश्वासन दिलं होतं की, जर कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही, तर त्याला आम्ही सीएसकेमध्ये घेणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT