rahul dravid twitter/bcci
क्रीडा

Team India Head Coach: टीम इंडियाची वॉल भक्कम, राहुल द्रविड राहणार प्रशिक्षकपदी कायम!

Ankush Dhavre

Rahul Dravid Head Coach:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफबाबत मोठा निर्णय घेतला आहे. २०२३ वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता.

मात्र बीसीसीआयने (BCCI) आता या सर्वांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा कार्यकाळ किती दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. (Rahul Dravid)

बीसीसीआयने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविडसोबत करार वाढवण्याबाबत चर्चा केली होती. चर्चा केल्यानंतर राहुल द्रविड मुख्यप्रशिक्षकपदी कायम राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल द्रविडसह गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि क्षेत्ररक्षक टी दिलीप यांच्या करारात देखील वाढ करण्यात आली आहे.

बीसीसीआयने पुढे म्हटलं की,'भारतीय संघाला आकार देण्यात राहुल द्रविडने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांचा व्यावसायिकपणा अतिशय महत्वाचा ठरला. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचेही बीसीसीआय कौतुक करत आहे. मैदानात जशी राहुल आणि लक्ष्मण यांची भागीदारी व्हायची, तशीच भागीदारी भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी दोघांमध्ये सुरु आहे.' (Latest sports updates)

याबाबत बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, 'भारतीय संघासोबत घालवलेली २ वर्ष अविस्मरणीय होती. आम्ही एकत्रितपणे चढ-उतार पाहिले. या संपूर्ण प्रवासात संघाकडून मिळालेली साथ आणि पाठींबा अतिशय महत्वाचा ठरला.'

तसेच ते पुढे म्हणाले की,' आम्ही ड्रेसिंग रुममध्ये जे वातावरण निर्माण केलं, त्याचा मला अभिमान वाटत आहे. संघात असणारी प्रतिभा आणि क्षमता शानदार आहे. आम्ही नेहमी योग्य मार्गावर आणि तयारीवर लक्ष केंद्रीत केलं. त्याचा परिणाम निकालावर दिसून आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

SCROLL FOR NEXT