भवानी देवीने भारतीय तलवारबाजीत इतिहास रचला; पण... Saam Tv
Sports

भवानी देवीने भारतीय तलवारबाजीत इतिहास रचला; पण...

टोकियो ऑलिम्पिक मधील भारतीय संघाची सुरुवात ही धमाकेदार झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tokyo Olympics 2020 : टोकियो Tokyo ऑलिम्पिक Olympics मधील भारतीय Indian संघाची Team सुरुवात ही धमाकेदार झाली आहे. भारताच्या सीए भवानी देवीनं Bhavani Devi मोठा इतिहास रचत ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजिजचा पराभव करत तलवारबाजीचा fencing सामना जिंकले आहे. ऑलिम्पिक मधील तलवारबाजीचा सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू भवानी देवी ही आहे.

भवानी देवी महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ ६४ सामन्यात १५- ३ या फरकाने विजय मिळविला आहे. ८ वेळेस राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या भवानी देवीच्या या सामन्यामध्ये अगोदरपासूनच प्रतिस्पर्धी ट्यूनिशियाच्या नादियावर दबदबा गाजवत होता. भवानीने सामन्यात पहिला राउंड ही अगदी सहज ८- ० अशा फरकानी जिंकली आहे.

हे देखील पहा-

२७ वर्षीय भवानी देवीनं २ राउंड मध्ये ट्यूनिशिच्या खेळाडूना एकही संधी देखील नाही दिली. २ राउंड मध्ये भवानी देवीनं ७- ३ या फरकाने आपल्या बाजूनी केली आहे. भवानी देवीनं ६ मिनिटांमध्ये हा सामना आपल्या खिशात घातला होता. महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ ३२ मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेट सोबत याच्याशी होणार आहे.

चेन्नई मध्ये राहणारी भवानी देवी ऑलिम्पिककरिता क्वॉलिफाय असणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरली आहे. ८ वेळेस नॅशनल चॅम्पियन राहणाऱ्या भवानी देवीनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप संघ इवेंट्स मधील १ सिल्वर तर १ कांस्य पदक जिंकले होते. याच चॅम्पियनशिपमध्ये इंडिव्ह्युजअल इवेंटमध्ये देखील भवानीच्या नावावर १ कांस्यपदक राहिला आहे.

२०१० च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियन शिपमध्ये देखील तिने कांस्यपदक जिंकले होते. दरम्यान, तलवारबाजीच्या सेबर स्पर्धेत तलवारबाज प्रतिस्पर्ध्यावर वार करत गुणांची कमाई करत असतो. यामध्ये कंबरेच्यावर आणि मनगटा व्यतिरिक्त कुठेही तलवारीने स्पर्श करुन गुण मिळवता येत असतो.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT