ben stokes saam tv
क्रीडा

Ben Stokes Record: बेन स्टोक्सने रचला इतिहास! तब्बल 43 वर्षांनंतर कसोटीत पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड

Ben Stokes Fastest Fifty In Test Cricket: इंग्लंडचा आक्रमक फलंदाज बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमधील ४३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

इंग्लंड आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने १० गडी राखून विजय मिळवला. यासह इंग्लंडने वेस्टइंडिजचा ३-० ने सुपडा साफ केला. दरम्यान या सामन्यात इंग्लंडकडून वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या बेन स्टोक्सने ४३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

इंग्लंड आणि वेस्टइंडिज यांच्यातील तिसरा सामना बर्मिंगहॅममध्ये पार पडला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने तुफान फटकेबाजी केली. त्याने अवघ्या २४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह हे इंग्लंडसाठी कुठल्याही फलंदाजाने झळकावलेलं सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड इंग्लंडचा दिग्गज खेळाडू इयान बोथमच्या नावावर होता. त्याने ४३ वर्षांपूर्वी भारतीय संघाविरुद्ध दिल्लीत खेळताना २८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.

सर्वात जलद अर्धशतक कोणी झळकावलंय?

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा पाकिस्तानचा माजी फलंदाज मिस्बाह उल् हकच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना अवघ्या २१ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज

मिस्बाह-उल-हक (पाकिस्तान)- २१ चेंडू- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१४

डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)- २३ चेंडू- विरुद्ध पाकिस्तान, २०१७

जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)- २४ चेंडू- विरुद्ध झिम्बाब्वे, २००५

बेन स्टोक्स (इंग्लंड)- २४ चेंडू- विरुद्ध वेस्टइंडिज , २०२४

शेन शिलिंगफोर्ड- २५ चेंडू- विरुद्ध न्यूझीलंड, २०१४

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी बेन स्टोक्स आणि बेन डकेट यांची जोडी मैदानावर आली होती. या जोडीने टी-२० स्टाईल फलंदाजी करत अवघ्या ७.२ षटकात आव्हान पूर्ण केलं. स्टोक्सने ५७ धावांची खेळी केली. तर डकेटने नाबाद २५ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT