rohit sharma twitter
Sports

IND vs NZ: बेहेन डर गई.. रोहित शर्माची फटकेबाजी; शमा मोहमद ट्रोल; पाहा भन्नाट मीम्स

Rohit Sharma Shama Mohamed Viral Memes: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनलमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली

Ankush Dhavre

रोहित शर्मा जाडा आहे.. तो भारताचा सर्वात खराब कर्णधार आहे... असं वक्तव्य काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी केलं होतं. रोहितला वजन कमी करण्याची गरज आहे, असंही त्या म्हणाला होत्या. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये रोहित शर्माने चौकार- षटकारांचा पाऊस पाडल्यानंतर नेटकऱ्यांनी शमा मोहमदला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

नेटकऱ्यांनी शमा मोहमदची घेतली शाळा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडने २५१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने दमदार सुरुवात करुन दिली. रोहितने सुरुवातीपासूनच चौकार- षटकारांचा पाऊस पाडला. रोहितची ताबडतोड फलंदाजी सुरु झाल्यानंतर, सोशल मीडियावर शमा मोहमद ट्रोल होऊ लागल्या.

शमा मोहमद यांनी रोहितच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता रोहितने आपल्या बॅटने त्यांना चांगलच उत्तर दिलं. रोहितची फटकेबाजी पाहून एका युझरने गँग्स ऑफ वासेपूर सिरीजमधील एक मीम शेअर केला आहे. ज्यावर 'कांप रही हो?...' असं लिहिलंय. तर आणखी एका युझरने न्यूझीलंड संघातील खेळाडूंचा फोटो शेअर केला आहे. या खेळाडूंच्या चेहरा एडीट करुन शमा मोहमद यांचा चेहरा लावण्यात आला आहे

न्यूझीलंडने केल्या २५१ धावा

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजी करताना डॅरील मिचेलने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. तर मायकल ब्रेसवेलने नाबाद ५३ धावांची खेळी केली. तर रचिन रविंद्रने ३७ आणि ग्लेन फिलिप्सने ३४ धावांची खेळी करत २५१ धावांपर्यंत मजल मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT