आर अश्विन आणि मिताली राज यांची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस! Twitter/ @ani_digital/ @ashwinravi99
क्रीडा

आर अश्विन आणि मिताली राज यांची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस!

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी क्रीडा मंत्रालयानं वेळ वाढवून दिली होती. याआधी 21 जून ही अखेरची तारीख देण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीसीसीआयनं (BCCI) भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज (Mithali Raj) यांच्या नावाची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

माध्यामांशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, आम्ही या शिफारशींबाबत सविस्तर चर्चा केली आणि चर्चेनंतर अश्विन व मिताली यांचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी पाठवण्याचे ठरवण्यात आले. तसेच अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, लोकेश राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी क्रीडा मंत्रालयानं वेळ वाढवून दिली होती. याआधी 21 जून ही अखेरची तारीख देण्यात आली होती. मागच्या वर्षी मनिका बत्रा, रोहित शर्मा, विनेश फोगाट, राणी रामपाल आणि मरियप्पन फंगावेलू यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde: माझ्याविरोधातील उमेदवार लवकर ठरवा, मीच तुतारीच्या नेत्याला सांगितलं, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

Voter List: मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? या सोप्या पद्धतीने तपासा

Like And Subscribe: अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा ‘लाईक आणि सबस्क्राइब’ OTT वर होणार रिलीज! कुठे अन् कधी पाहता येणार?

Maharashtra News Live Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकमध्ये धडाडणार

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

SCROLL FOR NEXT