BCCI central contract rule latest update : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टसंबंधी नियमात बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हा नियम लागू झाला तर, नवख्यांपासून दिग्गज खेळाडूंपर्यंत सगळ्यांनाच त्याचा फटका बसू शकतो. आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानातील कामगिरी आणि ज्येष्ठतेच्या आधारे खेळाडूंचा समावेश सेंट्रल कॉन्ट्रक्टमध्ये केला जात होता. मात्र, आता बीसीसीआय या नियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. सामन्यांसाठी खेळाडूची उपलब्धता यासंदर्भात नव्या अटीचा समावेश करण्याबाबत बीसीसीआयकडून विचार सुरू आहे. खेळाडू किती सामन्यांमध्ये खेळण्यासाठी 'तंदुरुस्त' किंवा उपलब्ध होता याआधारे सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघातील अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. त्यांना वारंवार संघाबाहेर जावे लागले आहे. अनेक खेळाडूंना तर एखादी मालिका सुरू असतानाच, किंवा मालिकेच्या काही दिवस आधीच संघाबाहेर बसावे लागले. काही खेळाडूंचा समावेश संघात करण्यात आला होता, परंतु दुखापतीमुळे त्यांना संघाबाहेर बसावे लागले आहे. त्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला संघात स्थान द्यावे लागले आहे. अनेक महत्वाच्या स्पर्धांनाही या खेळाडूंना मुकावे लागले आहे. ही बाब लक्षात घेऊन खेळाडू फिट राहून जास्तीत जास्त सामन्यांसाठी उपलब्ध राहावेत, या उद्देशानं नियमात बदल करण्याचा विचार मंडळाकडून करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीसीसीआयकडून सध्या एका वेगळ्याच फॉर्म्युलावर चर्चा करण्यात येत आहे. संपूर्ण मोसमात खेळाडूचा फिटनेस आणि त्याच्या उपलब्धतेवर लक्ष असणार आहे. मंडळाकडून एक सीमा निश्चित करण्यात येऊ शकते. सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी खेळाडूला किमान किती सामने खेळावे लागतील किंवा त्या किती सामन्यांसाठी उपलब्ध राहावे लागेल, हे पाहिले जाण्याची शक्यता आहे.
स्पोर्ट्स तकने बीसीसीआयच्या एका सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टनुसार, सध्या हा बदल विचाराधीन आहे. सध्या तरी मंडळाच्या स्तरावर यावर प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. असा कोणता नवा नियम लागू करणे योग्य किंवा सहज शक्य होईल याची चाचपणी केली जाणार आहे. अद्याप यावर कोणताही निश्चित किंवा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
आगामी काळात असा कोणताही नियम लागू झाला किंवा त्याला मंजुरी मिळाली तर, भविष्यात भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार नाही तर, संघासाठी उपलब्ध होण्याकरिता कायम फिट राहावे लागणार आहे. संघासाठी कायम उपलब्ध असतील त्याच खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची गॅरंटी असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.