Will IPL 2023 Cancel Saam tv
Sports

Will IPL 2023 Cancel: आयपीएल 2023 स्पर्धा रद्द होणार? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Will BCCI postpone IPL 2023: कोरोनाची भिती पाहता बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

Ankush Dhavre

Is IPL 2023 Cancelled?: सध्या भारतात आयपीएल स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच सामना पाहण्यासाठी प्रेक्षक लाखोंच्या संख्येने मैदानात येत आहेत.

दरम्यान कोरोनाची भिती पाहता बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

एका सूत्राने म्हटले की, “बीसीसीआयने आयपीएलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांना सतर्क आणि सावध राहण्यास ईशारा दिला आहे. आम्हाला माहित आहे की कोविड वाढत आहेत परंतु काळजी करण्यासारखे काही नाही.''

तसेच ते पुढे म्हणाले की,''आम्ही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा आमच्यासाठी सर्वोपरि आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. आमची टीम परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही.” (Latest sports updates)

सध्या भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात भारतात 4435 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4.47 कोटी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

याचा परिणाम आयपीएल स्पर्धेवरही होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील कोरोना असताना आयपीएल स्पर्धा खेळवली गेली होती. मात्र खेळाडूंना बायो बबलमध्ये राहावे लागले होते. आता जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तर बीसीसीआयला बायो बबल शिवाय पर्याय उरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, पोलिसांची परवानगी

Ranveer Singh: या हॉरर चित्रपटाचा भाग होणार रणवीर सिंग, लवकरच होईल चित्रपटाची घोषणा

Maharashtra Politics : शरद पवार - अजित पवार यांची भेट, तासभर चर्चेत नेमकं काय झालं? | VIDEO

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

SCROLL FOR NEXT