csk vs gt 2024 match Saam TV
क्रीडा

CSK vs GT 2024: शुभमन गिलला मोठा झटका, बीसीआयने ठोठावला दंड; चेन्नई-गुजरात सामन्यानंतर नेमकं काय घडलं?

Shubman Gill IPL 2024: शुभमन गिल आणि साई सुदर्शन गुजरातच्या विजयाचे हिरो ठरले. पण, या सामन्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलवर बीसीसीआयने मोठी कारवाई केली.

Satish Daud

आयपीएल २०२४ स्पर्धेचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्ले ऑफसाठी तब्बल ८ संघांमध्ये चुरस रंगली आहे. यामध्ये गुजरात टायटन्सचा देखील समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात गुजरातने चेन्नईला पराभूत करत प्ले-ऑफसाठी आपली दावेदारी कायम ठेवली.

शुभमन गिल आणि साई सुदर्शन गुजरातच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनीही शतके झळकावत गुजरातला शानदार विजय मिळवून दिला आहे. मात्र, या सामन्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलवर बीसीसीआयने मोठी कारवाई केली.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेट राखल्याने बीसीसीआयने शुभमनला तब्बल २५ लाखांचा दंड ठोठावला. याआधी देखील शुभमन गिलच्या संघाने एका सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवले होते. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ही त्यांची दुसरी चूक होती. त्यामुळेच बीसीसीआयने गिलला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे.

इतकंच नाही, तर त्यामुळे यापुढील सामन्यात गुजरातने अशी चूक पुन्हा केली, तर शुभमन गिलवर एका सामन्याची बंदी येऊ शकते, असं बीसीसीआयने निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे गिलला पुढील सामन्यात स्लो ओव्हर रेटबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.

चेन्नई-गुजरात सामन्याचा धावता आढावा

  • चेन्नईचा कर्णधार ऋतूराज गायकवाड याने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

  • प्रथम फलंदाजी करताना गुजरातने निर्धारित २० षटकांत २३१ धावा केल्या.

  • गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शनने शानदार शतके झळकावली.

  • शुभमन गिलने ५५ चेंडूत १०४ तर साई सुदर्शनने ५१ चेंडूत १०३ धावा कुटल्या.

  • २३२ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली, गायकवाड, रहाणे आणि रचिन रवींद्र स्वस्तात माघारी परतले.

  • मिचेल आणि मोईन अलीने चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही अर्धशतके झळकावली.

  • तरीही चेन्नईला निर्धारीत षटकांत ८ बाद १९६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे गुजरातने हा सामना ३५ धावांची जिंकला.

  • गुजरातकडून मोहित शर्माने जबरदस्त गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT