Indian woman team Saam tv
Sports

Amol Muzumdar: भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रशिक्षक म्हणून मिळाला 'दुसरा सचिन'; पदार्पणातच कुटल्या होत्या २६० धावा

Amol Muzumdar: बीसीसीआयने भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

Amol Mujumdar Latest News:

बीसीसीआयने भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट महिला संघाला अमोल मुजुमदारच्या रुपाने नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने महिलांच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमोल मुजुमदारची निवड केली आहे.(Latest Marathi News)

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी तुषार अरोठे , जॉन लुईस आणि अमोल मुजुमदार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अखेर बीसीसीआयने अमोल मुजुमदारच्या नावावर शिक्कामोर्तब केला. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

रणजी करंडक स्पर्धेत अमोल मुजुमदारने २१ वर्षांच्या करिअरमध्ये १७१ सामन्यात ३० शतकासहित ११,००० धावा केल्या आहेत. तर मुजुमदारने १०० हून अधिक ए मॅचमध्ये तर १४ टी-२० सामने खेळले आहेत.

मुंबईकडून खेळताना संघाने रणजी चषक जिंकण्याचा मान देखील पटकावला आहे. मुजुमदारने आसाम आणि आंध्रप्रदेशचंही नेतृत्व केलं आहे.

मुजुमदारने 1993-94 मध्ये रणजी करंडक स्पर्धेतून हरियाणाविरोधातील पहिल्या सामन्यात धमाकेदार द्विशतकी खेळी केली होती. त्याने या सामन्यात २६० धावा कुटल्या होत्या. दमदार कामगिरीमुळे अमोल हा 'दुसरा सचिन' म्हणून ओळखला जाऊ लागला.

भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर अमोल मुजुमदार म्हणाला, ' माझी भारतीय महिला क्रिकेट टीमच्या (वरिष्ठ महिला) मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यामुळे अभिमान वाटतोय. बीसीसीआयने माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सीएसी आणि बीसीसीआयचे आभार मानतो'.

'माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मी आता टीम इंडियातील प्रभावशाली महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे. पुढील दोन वर्ष हे विश्वचषकामुळे महत्वाचे आहेत, असेही अमोल मुजुमदार पुढे म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूर नगरपालिका निवडणुकीत 58.30 % मतदान

SCROLL FOR NEXT