indian cricket team twitter
Sports

Team India News: वर्ल्डकप विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव! BCCI कडून तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस जाहीर

Prize Money For Team India From BCCI: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयानंतर बीसीसीआयने मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार जल्लोष झाला आहे. दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी भारतीय संघासाठी १२५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. यासह त्यांनी भारतीय संघाला १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणा केली आहे.

जय शहा यांनी पुढे लिहिले की, ' भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत असाधारण, दृढ संकल्प आणि खेळ भावनेने कामगिरी केली आहे. या उत्कृष्ठ कामगिरीमुळे सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचे विशेष अभिनंदन.'

दुसऱ्यांदा कोरलं जेतेपदावर नाव

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. २००७ मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०१४ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र या सामन्यात श्रीलंकेकडून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर २००७ नंतर भारतीय संघाने आयसीसी टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे.

भारतीय संघाचा शानदार विजय

बारबाडोसमध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. त्याने अक्षर पटेलसोबत मिळून ७२ धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर १७१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ७ धावा दुर राहिला. यासह भारतीय संघाने दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personal Loan EMI: पर्सनल लोन घेतलंय? व्याजाचा बोजा कमी करण्यासाठी हे 5 उपाय नक्की करा

Palghar Fort : निसर्गाच्या सान्निध्यात; १,०७० फूट उंच पालघरमधील 'हा' किल्ला तुमचं पुढचं ट्रेकिंग डेस्टिनेशन

Maharashtra News Live Update :पुण्यात कोंढवा कौसरबागेतील रस्ता अतिक्रमणमुक्त

Nushrratt Bharuccha: प्रसिद्ध अभिनेत्रीचा परदेशात धक्कादायक अपघात; ऑक्सिजन सपोर्टवर, एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत दाखल

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील अनेक ट्रेन रद्द; काहींचे मार्ग बदलले, वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT