T 20 WORLD CUP Team India Squad  SAAM Tv
क्रीडा

T-20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

आशिया कप स्पर्धा २०२२ नुकतीच पार पडली असताना आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

नरेश शेंडे

आशिया कप स्पर्धा २०२२ नुकतीच पार पडली असताना आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या पदरी निराशाच पडली. पण, आता आगामी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी कंबर कसली आहे. विश्वचषक जिंकणे हेच आमचं ध्येय असा ठाम निर्धार करत कर्णधार रोहित शर्माची पलटण आता नव्या जोशात विश्वचषकासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाच्या निवड समितीने नुकतीच संघाची घोषणा केली आहे. १६ ऑक्टोबर २०२२ ला टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे.

'असा' आहे टीम इंडियाचा स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार ), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिपक हुडा, रिषभ पंत (विकेट किपर) दिनेश कार्तिक (विकेट किपर), हार्दिक पंड्या, आर आश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदिप सिंग.

स्टॅंडबाय प्लेयर्स : मोहम्मद शामी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई, दिपक चहर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी 'असा' आहे टीम इंडियाचा स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार ), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिपक हुडा, रिषभ पंत (विकेट किपर) दिनेश कार्तिक (विकेट किपर), हार्दिक पंड्या, आर आश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, हर्षल पटेल, दिपक चहर, जसप्रीत बुमराह

दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी 'असा' आहे टीम इंडियाचा स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार ), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिपक हुडा, रिषभ पंत (विकेट किपर) दिनेश कार्तिक (विकेट किपर), आर आश्वीन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदिप सिंग, मोहम्मद शामी, हर्षल पटेल, दिपक चहर, जसप्रीत बुमराह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: OMG! कूलरमध्ये ८ फूट साप दबा धरुन बसला, घरातल्यांना पळती भुई थोडी, व्हिडीओ व्हायरल

Khopoli Accident : भल्या पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, खासगी बस ट्रकला धडकली, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो', पुस्तक बॉम्बमुळे महायुतीची कोंडी

Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे

SCROLL FOR NEXT