Rinku Singh Five Six cricbuzz
Sports

Five Sixes In An Over: केवळ Rinku Singh नव्हे तर 'या' फलंदाजांनी देखील मारले आहेत एकाच षटकात सलग ५ षटकार

Batters hitting 5 sixes in an over: केवळ रिंकू सिंग नव्हे तर आणखी ३ फलंदाजांनी एकाच षटकात ५ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

Ankush Dhavre

Rinku Singh IPL 2023: कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाज रिंकू सिंगने एकाच षटकात ५ षटकार मारून क्रिकेट विश्वात धुमाकूळ घातला आहे.

रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी २९ धावांची गरज होती. त्यावेळी रिंकू सिंगने सलग ५ षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला.

केवळ रिंकू सिंग नव्हे तर आणखी ३ फलंदाजांनी एकाच षटकात ५ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

ख्रिस गेल विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया

युनिव्हर्स बॉसने सर्वप्रथम आयपीएल स्पर्धेत ५ चेंडूंमध्ये ५ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. त्याने २०१२ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुल शर्माच्या गोलंदाजीवर ५ षटकार मारले होते. या सामन्यात त्याने ४८ चेंडूंमध्ये ८१ धावांची खेळी केली होती.

राहुल तेवतिया विरुद्ध पंजाब किंग्ज

पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील २०२० मध्ये झालेला सामना हा सर्वोत्तम सामन्यांपैकी एक आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने २२४ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघाने ६ गडी बाद २२६ धावा ठोकल्या होत्या. राहुल तेवतिया हा या विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याने कॉट्रेलच्या एकाच षटकात सलग ५ षटकार मारून राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला होता. (Latest sports updates)

रवींद्र जडेजा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने एकाच षटकात सलग ५ षटकार मारले होते. त्याने हर्षल पटेलच्या एकाच षटकात ५ षटकार ठोकले होते. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने १९१ धावांचा डोंगर उभारला होता. तर एकट्या जडेजाने २८ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT