National level basketball player dies saam tv
Sports

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

National level basketball player dies: देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉलपटूचा सरावादरम्यान बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लाखनमाजरा गावात एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी एका तरूणाचा मैदानात सराव करताना पोल तुटून पडल्याने मृत्यू झाला आहे. १७ वर्षीय हा तरूण राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू होता. हार्दिक राठी असं त्याचं नाव होतं. हार्दिक राठीने तीन सब-ज्युनियर नॅशनल आणि एक युथ नॅशनल स्पर्धेत भाग घेतला होता. तसंच बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या इंदूर अकादमीसाठी त्याची निवड झाली होती.

अकॅडमीतून त्याला सरावासाठी फोन करून बोलावण्यात येत होतं. मात्र सध्या तो गावातच सराव करत होता. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हार्दिक मैदानात सराव करत होता. त्यावेळी टीतील इतर सदस्य बाजूला काही वेळ आराम करत होते.

कसा घडला अपघात?

बास्केटबॉलच्या पोलवर उडी मारून प्रॅक्टिस करताना अचानक तो पोल हार्दिकवर कोसळला. जवळच बसलेले खेळाडू काही सेकंदांतच त्याला पोलखालून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. लाखनमाजरा पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कुटुंबीयांच्या निवेदनावर कारवाई करत मृतदेहाचं पोस्टमार्टम करून ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिलंय.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद

पोलिसांच्या माहितीनुसार, लाखनमाजरा गावातील संदीप यांची दोन मुलगे आहेत. त्यांचा मोठा मुलगा 17 वर्षीय हार्दिक राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू होता. हार्दिकच्या मृत्यूची संपूर्ण घटना मैदानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे

फुटेजनुसार, हार्दिक मैदानात सराव करत होता. वर उडी मारताना अचानक पोल त्याच्यावर कोसळला. त्याच वेळी जवळ बसलेल्या खेळाडूंनी पोल उचलून त्याला बाहेर काढलं. यावेळी त्यांनी तातडीने त्याला रूग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर गावात आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT