Angelo Mathews timed Out Saam tv
Sports

Angelo Mathews timed Out: 'मी तो निर्णय...; अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर शाकीब हसन स्पष्टच बोलला!

Angelo Mathews timed Out: पंचाने नियमानुसार अँजेलो मॅथ्यूजला बाद घोषित केले. यानंतर या सर्व प्रकरणावर शाकीब हसनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

Shakib al hasan on Angelo Mathews timed Out:

सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज मैदानात झाला. अँजेलो मॅथ्यूज मैदानात आल्यानंतर त्याने दुसरं हेल्मेट मागवलं, यामध्ये तीन मिनिटांचा अवधी गेला. तरीही अँजेलो मॅथ्यूजनं फलंदाजी सुरु न केल्यामुळे बांगलादेशच्या शाकीब हसनने पंचाकडे अपील मागितली. त्यानंतर पंचाने नियमानुसार अँजेलो मॅथ्यूजला बाद घोषित केले. या सर्व प्रकरणावर शाकीब हसनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर शाकीब हसनने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली. शाकीब हसन म्हणाला, माझ्या खेळाडून सांगितलं की, जर मी अपील केलं तर अँजेलो मॅथ्यूज बाद होऊ शकतो, त्यानंतर मी पंचाला सांगितलं. त्यांनी म्हटलं की, तुम्हाला जर अपील करायची असेल तर करु शकता' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'त्यानंतर मी म्हटलं की, जर खेळाडू बाद होत असेल तर मी अपील करेलच. आता हे चूक होतं की बरोबर मला माहीत नाही. पण ही अपील नियमात बसेल तर मी नक्कीच अपील करेल, असंही शाकीब पुढे म्हणाला.

अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर श्रीलंकेचा कर्णधार काय म्हणाला?

अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस म्हणाला, 'खरं तर हे खूप निराशाजनक आहे. मला वाईट वाटतं की, पंचांनी अँजेलो मॅथ्यूजच्या बाजूने योग्य निर्णय घेतला नाही. हे पाहायला चांगलं नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Metro : पुणेकरांचा नेम नाही, मेट्रोमध्ये केले प्री वेडिंग शूट, नंतर...

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेतीच्या वादातून नातेवाईकांत हाणामारी,एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

Borivali crime : बोरीवली हादरली! कामावर जाताना, नराधमाने वाटेतच डाव साधला, पूलाखाली ओडले अन्....

SSC Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेसंदर्भात बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Child Eye Health: मुलांना चष्मा लागू नये वाटत असेल तर काय करावं? पालकांसाठी नेत्ररोग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT