Death News x
Sports

Death : शटलकॉक घ्यायला गेला अन् खाली कोसळला, बॅडमिंटन खेळताना २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Death News : २५ वर्षीय तरुणाचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याचे म्हटले जात आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.

Yash Shirke

  • २५ वर्षीय तरुणाचा बॅडमिंटन कोर्टवर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • शटलकॉक उचलताना तरुण खाली पडला आणि उठलाच नाही.

  • तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shocking : काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला होता. तरुणाने षटकार मारला आणि तो खाली पडला. मित्र जवळ गेल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. अशीच एक धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. २५ वर्षीय तरुण बॅडमिंटन खेळत होता. खेळताना तो अचानक खाली पडला आणि पुन्हा उठलाच नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश नावाचा २५ वर्षीय तरुण हा बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटन खेळताना तो शटलकॉक उचलण्यासाठी मागे वळला. शटलकॉक उचलल्यानंतर तो बॅडमिंटनच्या कोर्टवर खाली पडला. तेथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव गुंडला राकेश असे आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तो हैदराबादच्या उप्पल स्टेडियमच्या इनडोअर कोर्टमध्ये त्याच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. खेळादरम्यान शटलकॉक घेण्यासाठी जात असताना तो पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना बॅडमिंटन कोर्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये राकेश खाली पडल्यानंतर त्याचे मित्र त्याच्याजवळ जातात हे दिसते. राकेशला त्याचे मित्र उठवण्याचा प्रयत्न करतात पण तो उठत नाही. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आले. रुग्णालयामध्ये नेल्यानंतर उपचार सुरु करण्याआधी डॉक्टरांनी राकेशला मृत घोषित केले. राकेशच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Ganesh Chaturthi 2025: चतुर्थीला कधी आहे गणेश स्थापनेचा मुहूर्त? जाणून घ्या स्थापनेची योग्य विधी

Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

Car Accident : भीषण अपघात; अनियंत्रण कार ४० फुटावरून नदीत कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू

Ganpati Bappa 2025: उजवी की डावी? शास्त्रानुसार कोणत्या सोंडेचा गणपती बाप्पा घरी बसवणं असतं शुभ?

SCROLL FOR NEXT