Indian National Cricket Team saam tv
क्रीडा

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; न्यूझीलंड सिरीजपूर्वी 'हा' खेळाडू झाला गंभीर जखमी!

Surabhi Jagdish

नुकतंच भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये २ सामन्यांची टेस्ट सिरीज रंगली होती. या सिरीजमध्ये टीम इंडियाने २-० असा बांगलादेशाचा दारूण पराभव केला. यानंतर आता टीम इंडियाला न्यूझीलंडविरूद्ध मायदेशात ३ टेस्ट सामन्याची सिरीज खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल पाहता आता प्रत्येक टेस्ट सिरीज भारतासाठी महत्त्वाची मानली जातेय. अशातच टीम इंडियासाठी एक महत्त्वाची आणि वाईट बातमी समोर आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अगोदर टीम इंडियाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्ध टेस्ट सिरीज खेळायची आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात ३ टेस्ट सामन्यांची सिरीज आणि त्यानंतर अखेरीस ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. यामधील पहिला टेस्ट सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाचा एक महत्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलं आहे.

टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जखमी

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या वर्षीच्या वनडे वर्ल्डकपनंतर मैदानात कमबॅक करू शकलेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याचा समावेश केला जाण्याची शक्यता होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. आता तो न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची शक्यता होती. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमी या दोन्ही सिरीजमधून कमबॅक करू शकणार नाही.

शमीची दुखापत वाढली

बीसीसीआयच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, शमीने गोलंदाजीची प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली होती. तो लवकरच कमबॅक करेल अशी चिन्ह देखील दिसून येत होती. मात्र त्याच्या गुडघ्याची दुखापत पुन्हा वाढली आहे. BCCI वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे.

मोहम्मद शमी नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे वर्ल्डकप फायनल गमावल्यानंतर खेळला नाही. डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सिरीजसाठी त्याची निवड करण्यात आली होती. मात्र डॉक्टरांनी त्याला खेळण्याची परवानगी दिली नसल्याचं समोर आलं होतं.

किती दिवसांसाठी बाहेर राहणार शमी?

समोर आलेल्या अहवालानुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिहॅबिलीटेशन घेत असताना शमीच्या गुडघ्यात सूज वाढली. अशा परिस्थितीत तो किमान सहा किंवा आठ आठवडे बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शमीच्या नव्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियातील सिरीजसाठी भारताच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन देखील वाढलं आहे.

बुमराहला देणार का आराम?

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारतासाठी महत्त्वाची मानली जातेय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शमीला तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो, अशी सिलेक्टर्सची आशा आहे. शमीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमधून विश्रांती दिली जाऊ शकते. जेणेकरून ऑस्ट्रेलियाविरूद्ध तो चांगली कामगिरी करू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Bhuyar News : दादांचा आमदार बरळला; भरसभेत ठरवली मुलींच्या सौंदर्याची कॅटेगरी, पाहा व्हिडिओ

Pune Helicopter Crash : तटकरेंना घेण्यासाठी जाताना दुर्घटना; हेलिकॉप्टर अपघातात 2 कॅप्टनसह एका इंजिनिअरचा मृत्यू, VIDEO

VIDEO: घोषणांचा पाऊस, अनुदानाचा दुष्काळ! कांदा उत्पादकांचे 24 कोटी कधी देणार?

Amit Deshmukh: सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अमित देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Israel Iran War : इराण की इस्रायल कोण पडणार युद्धात भारी? कोणाची किती ताकद? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT