Babar Azam Statement twitter (X)
Sports

Babar Azam Captaincy: वर्ल्डकपच्या अपयशानंतर पाकिस्तान संघात होणार मोठा बदल! बाबर आझम कर्णधारपदाचा राजीनामा देणार?

Babar Azam News: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर पाकिस्तान संघात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ankush Dhavre

Babar Azam Will Leave Captaincy After World Cup:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पाकिस्तानला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमधून बाहेर पडला आहे. वर्ल्डकप झाल्यानंतर बाबर आझम पाकिस्तानचे कर्णधारपद सोडेल असा दावा माध्यमातील काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपूर्वी पाकिस्तानला अंतिम फेरीत जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र आशिया चषक २०२३ स्पर्धेत पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं. पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीतही पोहचू शकला नाही.

वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये पाकिस्तानने कमबॅक केलं. मात्र त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये पाकिस्तानला भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचं वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला नाणेफेक जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला मोठं आव्हान उभं करायचं होतं. मात्र असं काहीच झालं नाही, कारण इंग्लंडने या सामन्यात नाणफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी बाबर आझमला सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातील वृत्तवाहीनी जियो सुपरच्या वृत्तानुसार,वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर बाबर आझम वनडे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन माघार घेऊ शकतो. (Latest sports updates)

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी बाबर आझमने पत्रकार परिषदेत बोलताना बाबर आझमने टीका करणाऱ्यांना सडतोड उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, '  माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी गेल्या ३ वर्षांपासून संघाचं नेतृत्व सांभाळून चांगली कामगिरी करतोय. TV वर बसून बोलणं सोपं आहे. ज्या लोकांना मला सल्ला द्यायचा आहे त्यांनी माझ्या नंबरवर कॉल करुन थेट माझ्याशी संपर्क साधावा. माझं लक्ष्य पुढील सामन्यावर आहे. मी नेतृत्वाच्या भविष्याबाबत नंतर विचार करेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT