AUSW vs INDW India Today
Sports

AUSW vs INDW: किती स्तृती करावी स्मृतीची! पर्थच्या मैदानात मंधानानं झळकावलं वनडे करिअरचं ९वं शतक

AUSW vs INDW: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज स्मृती मंधाना हिने अप्रतिम खेळी करत शतक झळकावले.

Bharat Jadhav

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानानं हिने पर्थमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण स्मृती मंधानानं शतक झळकावलं. मंधानाने धाडसी खेळी करत आपलं शतक ठोकलं. तिचं हे एकदिवसयी करिअरमधील ९ वे शतक होतं. तर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धात तिने दुसरं शतक केलं.

दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्धात खेळातना भारतीय महिला संघाचा 83 धावांनी पराभव झाला. भारताने प्रथम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मात्र ऑस्ट्रेलियाला आमंत्रण देणं हे भारतीय महिला संघाला महागात पडलं. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 298 धावांचं आव्हान भारतीय संघासमोर ठेवलं होतं.

स्मृती मंधानाने 2024 मध्ये तिचं चौथं एकदिवसीय शतक झळकावले आणि त्यानंतर महिला वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 4 शतके झळकावणारी ती पहिली खेळाडू ठरत तिने इतिहास रचला. कंगारू संघाविरुद्धाच्या सामन्यात मंधानाने 103 चेंडूत आपलं शतक केलं. या सामन्यात तिने 109 चेंडूंवर 105 धावांची खेळी करत बाद झाली. आपल्या खेळीत तिने एक षटकार लगावला आणि १४ चौकार मारलेत.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 50 षटकात 6 गडी गमावून 298 धावा केल्या. या संघाच्या वतीने ॲनाबेल सदरलँडने 95 चेंडूत 110 धावांची शानदार खेळी केली. भारताकडून अरुंधती रेड्डीने सर्वाधिक 4 बळी घेतले. या सामन्यात भारताने 215 धावा केल्या आणि 83 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनरने सर्वाधिक 5 बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT