Andrew Symonds Saam Tv
Sports

क्रिकेटविश्वाला धक्का; ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स काळाच्या पडद्याआड

सायमंड्सला वाचवण्याचा डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.

वृत्तसंस्था

मुंबई - मार्च महिन्यामध्ये थायलंडमध्ये सुट्टीवर असताना शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता त्याच्या काही आठवड्यांनंतरच क्रीडा जगताला दुसरा मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचे (Andrew Symonds) निधन झाला आहे. वयाच्या 46 व्या वर्षी सायमंड्सचे कर अपघातात निधन झाले आहे.

शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अँड्र्यू सायमंड्सच्या कारला अपघात झाला. अँड्र्यू सायमंड्स याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांसह क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. संपुर्ण देशात अँड्र्यू सायमंड्सचे चाहते होते. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचे देखील निधन झाले आहे.

जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. सायमंड्सला वाचवण्याचा डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. घटनास्थळी एका इसमाला वाचवताना हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात भरधाव वेगात असलेली कार उलटल्याचे समोर आले आहे. अपघाता झाला त्यावेळी अँड्र्यू सायमंड्स एकटाच गाडीत होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसह क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT