mohammed siraj  twitter
Sports

Mohammed Siraj: ऑस्ट्रेलियन फॅन्सचं हे चुकलंच! सिराज मैदानात येताच बुईंग

Australian Fans Boeed Mohammed Siraj: मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फॅन्स मोहम्मद सिराजला बुईंग करताना दिसून आले आहेत. Australian Fans Boeed Mohammed Siraj: मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फॅन्स मोहम्मद सिराजला बुईंग करताना दिसून आले आहेत.

Ankush Dhavre

ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र पहिल्याच दिवशी पावसाने व्यत्यय आणल्याने सामना थांबवावा लागला आहे. दरम्यान सामना सुरु होताच, जेव्हा सिराज गोलंदाजीला आला त्यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सने त्याला बुईंग करायला सुरुवात केली.

ब्रिस्बेनच्या मैदानावर असं काहीच घडलेलं नाही, ज्यामुळे सिराजला बुईंग केलं जात आहे. हे प्रकरण अॅडलेडच्या मैदानावर झालेल्या प्रकरणाशी निगडीत आहे. अॅडलेड कसोटीतील दुसऱ्या डावात सिराजने हेडची दांडी गुल केल्यानंतर, सिराजने त्याला रागात सेंड ऑफ दिला होता.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे फॅन्स नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आयसीसीने दोघांवर कारवाई केली. दोघांनाही १-१ डिमेरीट पॉईंट दिला आहे. ही फाईट आता गाबाच्या मैदानावर देखील रंगताना पाहायला मिळणार आहे.

पावसाने घातला खोडा

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि मॅकस्विनी ही जोडी मैदानात आली . दोघेही नाबाद माघारी परतले आहेत. पहिल्या दिवसातील पहिले सत्र पावसामुळे धुतले गेले. यासह दुसऱ्या सत्रातही पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली आहे.

तसेच या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारती संघाने बाजी मारत २९५ धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने हा सामना १० गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT