Australia squad for world cup 2023 saam tv
Sports

World Cup 2023: मिशन वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया सज्ज! प्रमुख फलंदाजाला वगळत २ खेळाडूंना दिली सरप्राईज एन्ट्री; पाहा संपुर्ण संघ

Australia Squad For World Cup 2023: या स्पर्धेच्या पार्श्नभूमीवर क्रिकेट ऑस्ट्र्रेलियाने १८ खेळाडू्ंच्या संघाची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

Australia's Full Squad For World Cup 2023:

भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धचा २०२३ थरार रंगणार आहे. ही स्पर्धा येत्या ५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेच्या पार्श्नभूमीवर क्रिकेट ऑस्ट्र्रेलियाने १८ खेळाडू्ंच्या संघाची घोषणा केली आहे.

या संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडेच राहणार असल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्र्रेलियाने केली आहे. तर संघातील आक्रमक फलंदाज मार्नस लाबुशेनला या संघातुन वगळण्यात आले आहे. मार्नल लाबुशेन संघाबाहेर असणं हा क्रिकेट फॅन्ससाठी मोठा धक्का आहे.

क्रिकेट ऑस्ट्र्रेलियाने असं म्हटलं आहे की, आगामी दक्षिण आफ्रिकाविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी आणि भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी देखील हाच संघ रवाना होणार आहे. १८ सदस्यीय संघातून १५ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. (Latest sports updates)

पॅट कमिन्सकडे संघाची जबाबदारी....

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आले आहे. पॅट कमिन्स नोव्हेंबर २०२२ मध्ये आपला शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता.

त्यानंतर त्याला एकही वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला वनडे फॉरमॅटमध्ये केवळ २ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले आहे. तर या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मार्नस लाबुशेनला दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मार्नस लाबुशेनने ३० वनडे सामन्यांमध्ये ३१.३७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ७ सप्टेंबरपासुन ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ५ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ २२ सप्टेंबरपासून भारतीय संघासोबत दोन हात करताना दिसून येणार आहे.

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा १८ सदस्यीस संघ..

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, अॅरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

५ मिनिटांत एकाच रस्त्यावर १४ अपघात; मुंबईतील घटनेने खळबळ

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

रत्नागिरीत थरारक अपघात! पोलीस गाडीला चिरडत २२ चाकांचा महाकाय कंटेनर दरीत; एका अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT