mitchell starc twitter
Sports

टी२० विश्वचषकाआधी कांगारूंना जबरी धक्का, मिचेल स्टार्कने घेतली निवृत्ती

Mitchell Starc Retires from T20 Internationals :ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्टार्क आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.

Namdeo Kumbhar

  • मिचेल स्टार्कने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

  • कसोटी आणि वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्णय.

  • ६५ सामन्यात ७९ विकेट्स घेतल्या, २०२१ विश्वचषकात महत्त्वाची भूमिका.

  • स्टार्क आयपीएलमध्ये पुढेही खेळणार आहे.

Mitchell Starc T20 Cricket Retirement : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कसोटी आणि वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मिचेल स्टार्क यांने क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकाराला रामराम ठोकला आहे. यापुढे स्टार्क ऑस्ट्रेलियासाठी टी२० क्रिकेट खेळताना दिसणार नाही. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० क्रिकेटपूर्वी हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का मानला जातोय.

मर्यादीत षटकांच्या सामन्यात मिचेल स्टार्क याने प्रभावी मारा केला आहे. मिचेल स्टार्क याने ऑस्ट्रेलियासाठी अनेकदा सामना, मालिका जिंकून देणारी गोलंदाजी केली आहे. २०२१ च्या टी२० विश्वचषक विजयात स्टार्कचा सिंहाचा वाटा होता. 2024 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्येही स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या संघाचा सदस्य राहिलाय. विश्वचषकानंतर मिचेल स्टार्क यांने ऑस्ट्रेलियासाठी एकही टी२० सामना खेळलेला नाही.

टी२० क्रिकेटमधून एक्झिट घेतल्यानंतर स्टार्क भावूक झाला होता. त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना स्टार्क म्हणाला की,' वनडे आणि देशांतर्गत टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्तीचा निर्णय घेतलाय.' दरम्यान, भारतामध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत स्टार्क खेळताना दिसणार आहे.

कसोटी माझ्यासठी नेहमीच प्राधान्य राहिलेय. भारताचा कसोटी दौरा, अ‍ॅशेस आणि २०२७ मध्ये होणारा वनडे वर्ल्डकप.. यासाठी मला तयारी करायची आहे. त्या स्पर्धेत खेळण्यासाठी ताजेतवाने, तंदुरुस्त राहण्यासाठी टी२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याचेही स्टार्कने सांगितले. मिचेल स्टार्कने २०१२ मध्ये टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ६५ सामन्यात ७९ विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर येथे गोकुळच्या डिबेंचर कपाती विरोधात दूध उत्पादकांचा जनावरांसह मोर्चा

Kalyan : खिशातून १,५०,००० रुपयांचा मोबाइल गायब; पठ्ठ्याने बस थांबवून घेतली प्रवाशांची झडती, कल्याणमधील घटना

Diwali Mithai Recipe: बाजारात मिळणारी मिठाई आता घरीच बनवा, या आहेत ४ चविष्ट रेसिपी

ManaChe Shlok: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘मनाचे श्लोक'चं नाव बदललं; 'या' नव्या नावासह होणार चित्रपट प्रदर्शित

Bihar Elections: भाजपचं पुन्हा धक्का तंत्र! विधानसभा अध्यक्ष, मंत्र्यांना डच्चू; तरुणांना उमेदवारी देत खेळला मोठा डाव

SCROLL FOR NEXT