Alyssa Healy celebrates her 158-run knock in her final ODI match against India before announcing retirement from the format. saam tv
Sports

Alyssa Healy: ऐन एकदिवसीय सामन्याच्या दरम्यान क्रिकेटरचा निवृत्तीचा निर्णय, अखेरच्या सामन्यात झळकावले शतक

Alyssa Healy Retires: ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिलीने भारताविरुद्धच्या सामन्यात १५८ धावांची खेळी केली. त्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे.

Bharat Jadhav

  • ऑस्ट्रेलियाने ३-० असा एकदिवसीय मालिका विजय मिळवला.

  • भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात १५८ धावांची खेळी.

  • एलिसा हिलीची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर.

ऑस्ट्रेलियाची दिग्गज महिला क्रिकेटपटू एलिसा हिलीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने १ मार्च रोजी भारताविरुद्ध तिचा शेवटचा सामना खेळला. तिच्या निवृत्तीच्या सामन्यात एलिसा हिलीने १५८ धावांची शतकी खेळी केली. यामुळे कांगारू संघाला भारतावर १८५ धावांचा मोठा विजय मिळवून देण्यात मदत झाली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिलीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या समाप्तीनंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा तिने जानेवारीमध्ये केली होती. दरमयान भारताने टी२० सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ अशा पद्धतीने पराभूत केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली.

आता दोन्ही संघांमधील कसोटी सामना ६ मार्च रोजी सुरू होणार आहे. हा अ‍ॅलिसा हिलीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. एलिसा हिलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत १२६ सामने खेळले आहेत. यात ३,७७७ धावा केल्या आहेत. तिने आठ शतके आणि १९ अर्धशतके केली आहेत. या फॉरमॅटमध्ये विकेटकीपर म्हणून तिने ८५ झेल घेतले आणि ३८ स्टंपिंग केल्या आहेत.

१८५ धावांनी जिंकला सामना

तिसऱ्या एकदिवशी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ४०९ धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात एलिसा हिलीने १५८ धावा केल्या. बेथ मूनी सोबत तिने १४५ धावांची भागीदारी केली होती. हिलीने तिच्या डावात २७ चौकार आणि दोन षटकार मारले. ४१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया २२४ धावांवर ऑलआउट झाली.

एकाही भारतीय फलंदाजाला लक्षणीय खेळी करता आली नाही. स्मृती मानधना शून्यावर बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्जने ४२ आणि स्नेह राणानेही ४४ धावा केल्या. परंतु नियमित अंतराने विकेट पडत राहिल्याने टीम इंडिया ४५.१ षटकांत २२४ धावांवर ऑल आऊट झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT