hasan ali dance twitter
Sports

Funny Cricket Video: फुल्ल ऑन एंटरटेनमेंट! फिल्डिंग करत असताना हसन अलीचा ऑस्ट्रेलियन फॅन्ससोबत हटके डान्स; Video

Funny Cricket Dance Video: दुसऱ्या कसोटी सामन्यात फॅन्सने हसन अलीसोबत केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Hasan Ali Dance With Cricket Fans:

फॅन्सशिवाय क्रिकेट काहीच नाही असं अनेकदा म्हटलं जातं. आपल्या संघाला आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यातून स्टेडियममध्ये हजेरी लावत असतात. आपल्या संघातील खेळाडूंनी चांगला खेळ करावा म्हणून फॅन्स त्यांना चियर करताना दिसून येत असतात.

तर काही फॅन्स डान्स आणि क्रिकेटची मजा घेण्यासाठी मैदानावर हजेरी लावत असतात. नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फॅन्सने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हसन अलीसोबत फॅन्सचा डान्स..

सध्या पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकट ग्राऊंडवर सुरू आहे. या सामन्यात क्रिकेट फॅन्सचा हटके डान्स पाहायला मिळाला आहे.

तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरू असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी हसन अली डान्स करत होता. त्याला पाहून स्टँड्समध्ये असलेले फॅन्सही डान्स करताना दिसून आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३१८ धावा केल्या. या डावात ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेनने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. या धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २६४ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ६ गडी बाद १८७ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयची मोठी कारवाई; 2 कोटींच्या सलामीवीर फलंदाजावर 2 वर्षे बंदी, वाचा कारण

NCP controversy : पटेल-तटकरेंना राष्ट्रवादीवर ताबा घ्यायचा होता, घटनेत बदल केला; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणातील सर्व गुन्हे SIT कडे वर्ग

Ashok Kharat Case: बाळू तुपे कोण? ज्याच्या हत्येचा अशोक खरातवर आहे आरोप

पुण्यात जमीन घोटाळा उघड! ४२४ प्रकरणांत गंभीर अनियमितता, चंद्रशेखर बावनकुळेंचे कारवाईचे आदेश; महसूल विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT