australia cricket team twitter
क्रीडा

T-20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा अवघ्या ३४ चेंडूत विजय! नामिबियाला नमवत केला सुपर ८ मध्ये प्रवेश

AUS vs NAM, Super 8: ऑस्ट्रेलियाने नामिबियाविरुद्ध झालेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने शानदार खेळ करुन दाखवला आहे. आतापर्यंत या संघाने ३ सामने खेळले आहेत आणि या तिन्ही सामन्यांमध्ये या संघाने विजयाला गवसणी घातली आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील २४ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३४ चेंडू आणि ९ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे .या विजयासह ऑस्ट्रेलियाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हा सुपर ८ मध्ये प्रवेश करणारा तिसराच संघ ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाला सुपर ८ मध्ये पोहोचवण्यात अॅडम झाम्पाने मोलाची भूमिका बजावली आहे. विरोधी संघातील फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर डान्स करताना दिसून आले आहेत. नामिबियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. तर पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडने फलंदाजी आक्रमणाचं कंबरडं मोडलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सुपरहिट ठरले. तर नामिबियाचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या संघाचा डाव १७ षटकात ७२ धावांवर आटोपला.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी ७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेड आणि मिचेल मार्शने तुफान फटकेबाजी केली आणि अवघ्या ५.४ षटकात सामन्याचा निकाल लावला. दोन्ही फलंदाजांनी २०० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. हेडने १७ चेंडूंचा सामना करत ३४ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ९ चेंडूंचा सामना करत १८ धावा चोपल्या.

या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्ड्स देखील बनवले गेले आहेत. ही टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पावरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने उभारलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाने ५.४ षटकात ७४ धावा केल्या. यासह हा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा मोठा विजय ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना ८६ चेंडू राखून जिंकला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT