Parul Chaudhary won Gold Medal :
आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज १० दिवस आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १४ सुवर्ण पदक जिंकली आहेत. आज पारुल चौधरीनं ५ हजार शर्यतीत सुवर्ण पदक मिळवलं आहे. पारुलने काल ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि तिने सुवर्ण इतिहास लिहिला. पारुलनं शेवटच्या ३० मीटरमध्ये पुनरागमन करताना १५ मिनिटे १४.७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक नावावर केलं.(Latest News)
अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकरात पारुलनं चौधरीनं रौप्य आणि प्रिती लांबानं कास्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारुलनं आज ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली. मेरठची चॅम्पियन मुलगी पारुल चौधरीच कहाणी खूप प्रेरणादायी आहे. पारुल चौधरी ही शेतकऱ्याची मुलगी आहे. ती तिच्या गावातून स्टेडियमपर्यंत पायी जात असे. पारुलनं ८ वर्षापूर्वी जो निश्चय केला त्यामुळे ती आज देशातील प्रथम क्रमांकाची धावपटू बनली आहे.
भारतानं पहिल्या दिवशी ५, दुसऱ्या दिवशी ६, तिसऱ्या दिवशी ३, चौथ्या दिवशी ८, पाचव्या दिवशी ३, सहाव्या दिवशी ८, सातव्या दिवशी ५, आठव्या दिवशी १५ पदके जिंकली आहेत. तर नवव्या दिवशी ७ पदक जिंकली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.