asian games 2023 twitter
Sports

Asian Games 2023: ये दिल मांगे मोर...आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा भीमपराक्रम! मेडल्सच्या बाबतीत मोडला स्वत:चाच रेकॉर्ड

Asian Games 2023 Records: भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वत:चाच रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023 Records:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत भारताने सर्वाधिक पदकं जिंकण्याच्या बाबतीत स्वत:चा रेकॉर्ड मोडून काढला आहे. २०१८ रोजी जकार्तामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ७० पदकं पटकावली होती. दरम्यान आशिया क्रीडा स्पर्धेत ७१ पदकांची कमाई करत भारताने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

बुधवारी (४ ऑक्टोबर) भारतीय तिरंदाजांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा आणि प्रवीण ओजसने मिश्र कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम फेरीत जोरदार विजय मिळवून देत भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.

हे आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेतील भारताचे ७१ वे पदक ठरले आहे. १९५१ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ५१ पदकं जिंकण्याचा पराक्रम केला होता. (Latest sports updates)

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत अशी आहे भारताची कामगिरी..

सुवर्णपदकं - १६

रौप्यपदकं- २६

कांस्पपदकं - २९

एकुण पदकं - ७१

आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धेतील भारताची कामगिरी..

सुवर्णपदकं- १६

रौप्यपदकं- २३

कांस्यपदकं- ३१

एकुण पदकं- ७०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षक मतदारसंघानंतर पदवीधर निवडणुकीतही महायुतीत ठिणगी? स्मिता जाधवांच्या सातारा दौऱ्यात नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत मिळणार : एकनाथ शिंदे

Diwali Cleaning : दिवाळीच्या साफसफाईची योग्य सुरुवात, आधी घरातून बाहेर काढा या अनावश्यक वस्तू

Ghee Benefits : रात्री पायाला तूप लावल्याने काय फायदा होतो? मालिश करण्याची योग्य पद्धत काय?

Supreme Court: मुलांनाही इंटरनेट वापरण्याचा मूलभूत अधिकार, बंदी घालता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT