PAK vs UAE Asia Cup 2025 match in Dubai — delayed start after Pakistan’s last-minute drama. saam tv
Sports

PAK vs UAE: आधी नकार आता होकार; आशिया कपमध्ये पाकिस्तानचा ड्रामा; उशिराने सुरू होणार थरारक सामना

PAK vs UAE Asia Cup Match: आशिया कपमध्ये आज पाकिस्तानविरुद्ध यूएईचा सामना होणार आहे. दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा करो किंवा मरो असा सामना आहे.

Bharat Jadhav

  • पाकिस्तान-यूएई आशिया कप सामना उशिरा सुरू झाला.

  • पाकिस्तान संघ वेळेवर मैदानावर न आल्यामुळे वॉकओव्हरची चर्चा झाली.

  • दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना खेळला जात आहे.

आशिया कपमध्ये आज बुधवारी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील. दरम्यान हा सामना एक तासाने सुरू होणार आहे. पाकिस्तानचा संघ आधी हॉटेलच्या बाहेर आला नव्हता, त्यामुळे पाकिस्तान संघाने ऐन स्पर्धेतून वॉकओव्हर केल्याची चर्चा सुरू झाली होती. आता पाकिस्तानचा संघ सामना खेळण्यासाठी मैदानाकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पाकिस्तान आणि भारताच्या सामन्यादरम्यान हॅण्डशेक वाद झाला होता. या वादातून पाकिस्तानच्या संघाने आशिया कपवर बहिष्कार घालू अशी धमकी दिली होती. स्पर्धेतील रेफरी अँण्ड पायक्रॉप्टला हटवण्यात यावे अशी मागणी पाकिस्तानने केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) झिम्बाब्वेच्या या रेफरीला संघाच्या उर्वरित सामन्यांमधून मॅच रेफरी म्हणून ठेवू नये, त्यांना हटवावे अशी विनंती केली होती.

आजच्या पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामन्यात पायक्रॉफ्ट देखील रेफरी म्हणून काम पाहणार आहेत. आजच्या सामन्यासाठी पायक्रॉफ्ट हे मॅच रेफरी राहतील. जर पाकिस्तान संघ खेळण्यासाठी आला नसता तर युएईला पूर्ण गुण मिळाले असते," असे पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shruti Marathe Photos: नाकात नथ, केसांत गजरा, गळ्यात हार; श्रुतीच्या सौंदर्यावर लाईक्सचा वर्षाव

Maharashtra Live News Update: नगर परिषदेच्या निवडणूकांची तारीख जाहीर; २ डिसेंबरला होणार मतदान

Pune Crime: पुणे हादरले! दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

Winter Beauty Hacks: फक्त त्वचेसाठी नाही तर केसांसाठीही उपयुक्त आहे Vaseline

माजी नगरसेवकाकडून तरूणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध, ९ वर्षांपर्यंत छळलं; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT